सावधान!
बऱ्याचदा आपल्या आयुष्यात अशी माणसे भेटतात जी आपल्या काहीच कामाची नसतात. ती फक्त आपल्या भाबड्या स्वभावाचा उपयोग करण्यासाठी आपल्या आसपास असतात. जर कधी आपल्यावर काही संकट आले, किंवा त्यांच्याकडून आपल्याला काहीशी मदत होणार असेल, तर ही माणसे खुशाल हात वर करतात. पुन्हा स्वतःचा दीडशहाणपणा ही सोडत नाहीत. असल्या लोकांना योग्य जागेवर ठेवायचे असेल, स्वतःचे पैसे, आत्मसन्मान, आणि प्रकृती जपायचे असेल, तर समंजस, सालस, समजूतदार, आणि प्रेमळ माणसाने काय करावे? भांडणं करून, संताप करून काही एक लाभ होत नसतो. तर शहाण्या माणसाने करण्याचे इतकेच उरते: १. असल्या स्वार्थी लोकांत उठणे - बसणे त्वरित थांबवले पाहिजे. आधी भेटण्याचे प्रमाण कमी करून, लवकरात लवकर स्वतःस आणि स्वतःच्या कुटुंबास असल्या लोकांपासून कायमचे दूर नेले पाहिजे. २. कामापुरते हसून, बोलून, बऱ्या बोलाने लांब जाणे, हा उत्तम पर्याय. ३. यांच्याशी कोणताही पैशाचा व्यवहार आवर्जून टाळावा. पण खरे म्हणजे कोणताही व्यवहारच टाळावा. ४. ज्यांना आपली किंमत नाही अशांचे काय लोणचे घालायचे? आणि ज्यांचा आपल्याला उपयोग नाही त्यांचे काय पापड घालायचे? अर्थात, प्र...