Posts

A Teacher's Lament!

  It is indeed the greatest misfortune of beloved Bharat Varsha, that very few or none of its modern-day inhabitants have any sense of appreciation for the great literary traditions and works in Bharat Mata's rich and varied languages. I am appalled at the kind and quality of education available to our future generations.  Textbooks are replete with errors of the most horrendous kind, here in Gujarat. There's hardly any sense of culture in the students. All they can think of is the basest, most despicable forms of pleasure and living. That's exactly what they have been exposed to at home and at school, no doubt. So while I do not blame them for what they are, I do believe that they have it in them to uplift themselves from the kind of mediocrity and ignorance that they currently wallow in! Their leaders, celebrities, and elders are no better. Wonder what is to become of an India where languages and Literature are no longer valued, only muscle flexing and self praise rule th...

ओम विश्वरुपाय नमः

Image
 लाडकी माणसे भेटून जातात ती काही आपल्या आयुष्यात टिकत नाहीत. पण नको ते वाहियात आणि निरर्थक लोक उगाच आपल्या उरावर चीटकून असतात.  एकतर हे असे असते किंवा आपल्या दृष्टीत काही गोष्टी येत नाहीत आणि आपण अजाण रहातो.  बरं, आपण स्वतः प्रामाणिक राहण्याचा, प्रेमळ आणि निस्वार्थ भावनांचा कितीही सत्कार केला, तरी आयुष्यात नको तेच होते, नको त्याच माणसांत आपण अडकतो. इतर कुणालाही आपल्या सारखे भाबडे, प्रेमळ, सालस वगैरे रहाण्यात काहीच रुची नसते. त्यांना जगाने चांगलेच चतुर, हरामी, निर्दयी वगैरे बनवून टाकलेले असते.  मग आपण स्वतःस मूर्ख ठरवून गप बसावे की आणि काही करायचे -- हा अत्यंत भांडावून सोडणारा प्रश्न.  मग एके दिवशी आपल्यालाच आपले समजते की - १. आपला मूळचा स्वभाव काही आपण बदलू शकत नाही, कारण तो अनेक प्रभाव आणि घटकांनी घडलेला असतो. २. आपण आपल्या मूळ स्वभावाशी प्रामाणिक रहाणे अत्यंत गरजेचे असते. खरे म्हणजे स्वभाव सोडून इतर काही करणे शक्यच नसते.  ३. म्हणूनच आपण स्वतःचा स्वभाव, प्रकृती, अंतरमन, आणि संस्कार - यांचा नेहमीच आदर केला पाहिजे. त्या सन्मान भावनेत हे सुद्धा माहीत असले पाह...

सावधान!

Image
 बऱ्याचदा आपल्या आयुष्यात अशी माणसे भेटतात जी आपल्या काहीच कामाची नसतात. ती फक्त आपल्या भाबड्या स्वभावाचा उपयोग करण्यासाठी आपल्या आसपास असतात. जर कधी आपल्यावर काही संकट आले, किंवा त्यांच्याकडून आपल्याला काहीशी मदत होणार असेल, तर ही माणसे खुशाल हात वर करतात. पुन्हा स्वतःचा दीडशहाणपणा ही सोडत नाहीत. असल्या लोकांना योग्य जागेवर ठेवायचे असेल, स्वतःचे पैसे, आत्मसन्मान, आणि प्रकृती जपायचे असेल, तर समंजस, सालस, समजूतदार, आणि प्रेमळ माणसाने काय करावे? भांडणं करून, संताप करून काही एक लाभ होत नसतो.  तर शहाण्या माणसाने करण्याचे इतकेच उरते: १. असल्या स्वार्थी लोकांत उठणे - बसणे त्वरित थांबवले पाहिजे. आधी भेटण्याचे प्रमाण कमी करून, लवकरात लवकर स्वतःस आणि स्वतःच्या कुटुंबास असल्या लोकांपासून कायमचे दूर नेले पाहिजे. २. कामापुरते हसून, बोलून, बऱ्या बोलाने लांब जाणे, हा उत्तम पर्याय. ३. यांच्याशी कोणताही पैशाचा व्यवहार आवर्जून टाळावा. पण खरे म्हणजे कोणताही व्यवहारच टाळावा. ४. ज्यांना आपली किंमत नाही अशांचे काय लोणचे घालायचे? आणि ज्यांचा आपल्याला उपयोग नाही त्यांचे काय पापड घालायचे? अर्थात, प्र...

एक लाडकी मुलगी

 ती एक मुलगी आज सुद्धा आठवते. रोजच ध्यानी - मनी दरवळत असते. तिला काही विसरता यायचे नाही. तिची उणीव नेहमीच भासत राहील.  एकदाच फक्त चिडलो होतो तिच्यावर. ते सुद्धा ती चालली आपल्या आयुश्यातून या विचाराने घाबरून. मग एकदा ती पुन्हा भेटली होती. असे वाटले होते की आमची मैत्री आता सुरक्षित आहे. आता आम्हा दोघांना कोणीही वेगळे करू शकणार नाही. पण मग काही ती पुन्हा दिसली नाही.  म्हाताऱ्या माणसाला दैवी दर्शन झाले त्याचे समाधान नाही! त्यास मैत्री, संवाद वगैरे हवे होते. त्याला कोण समजावणार कि तसले काही होत नसते. दैवी शक्त्यां आयुष्यात एकदाच येतात. त्या नंतर त्या हरवून जातात. आपण कितीही कळकळीची विनवणूक केली, खरे काय ते सांगण्याचा प्रयत्न केला, वगैरे ... त्याचा काही एक उपयोग होत नसतो. ती आली होती लाडक्या बाळा सारखी, आणि गेली तेव्हा खूप मोठी झाली होती. आपलेच बाळ आपल्यापेक्षाही मोठे होईल असे वाटले नव्हते. पण त्याला त्याचे आयुष्य जगायचे असते, त्यामुळे ते एके दिवशी दूर जात राहाते. आता यात न समजण्यासारखे काय आहे? तरी मनाचे माकड काही ऐकत नाही! पण पोरी, तू जेथे असशील तेथे सुखी रहा, हं. छान जग आपले...

The Ladies and Me

Image
I am a man simply in love with the idea of a woman. You see, I have a natural proclivity for growing things. I am nuts about bringing up both plants and animals. A trip to the nursery, or even a stable, is a source of unbridled, spontaneous, and quaking joy to me. Hence, you can well imagine how envious I am of individuals of my own species who are naturally selected to give birth and nurture a human life!  I grew up pretty much surrounded by girls and women, as fate would have it. Hence, I was always aware in lesser or better degree of the daily, monthly, and situational difficulties they faced. First it was aunts and cousins, then classmates at school and the university, then various colleagues, and then countless students. All through that, there were always my mom and sis at first, then wife and daughter. Being a man – a very straight one at that, in more ways than one – gives me a natural affinity for the opposite gender. So I am immediately, easily, and openly attracted to at...

53 वर्षीय जिवाची तार

Image
पाऊस पडला जीव लावून पाणी ओसरता, वाट पाहून कंटाळून जेलातली सजा! अभ्यास रद्द, मज्जाच मजा! मुर्ती करू कि चित्र? मांजरावानी भूंकतेय कुत्रं! गाणं म्हणू कि रडगाणं? आठवे बाहेर जाणं! आठवली मग गोड बाळं मायेची फुटली झारं बेचैन, होवू कसा गं पारं? जिवाची झाली तारं!

प्रेम कसे करावे

Image
 लहानपणीच निस्वार्थ प्रेमाचे कौतुक आणि महत्व पटले होते. प्रेम आणि आपुलकी शिवाय जगण्याला काही फारसा अर्थ नसतो हे सुद्धा जाणवल्याचे आठवते. मी मात्र पुर्वी पासून एककल्ली, निरागस, आणि अंतर्मुख.  अशा भाबड्या मनाला कोणी समजवावे कि सुखदुःख वगैरे सारे मनाचे खेळ असतात? प्रेमात सुद्धा मनस्ताप, गैरसमज इत्यादी असू शकतात याची कल्पना तेव्हा नव्हती.  पुढे, अनेक लक्षात रहाणारे आणि विसरलेले अनुभव झाल्यावर, कुणाला कुणावर कळकळून प्रेम करण्याचे प्रोत्साहन देण्यात सुद्धा काही अर्थ नाही, असेही वाटून गेले. आज, प्रेमाच्या विविध इष्टमुर्ति आठवताना खूप कृतज्ञतापूर्वक डोळे ओलावतात आणि सहज वाटून जाते कि आपल्या बाळांना सुद्धा हे असे प्रेम करायला शिकवले पाहिजे. होय, त्यांची प्रत्येक अपेक्षा आणि आशा वास्तवात काही आपल्या इष्टाचा प्रतिसाद मिळवणार नाही. पण आपण केलेल्या चुका त्यांना टाळता आल्या, तर मोठ्या आनंदाने जगतील आपली बाळे, एवढी आशा जपली आहे. खरे प्रेम माणसाने माणसावर करावे कि नाही? कारण बहुतेकदा, ते प्रेम वाया जाते असेच आढळून येते. त्यात कितीही निस्वार्थ भाव असला तरी शेवटी स्वतःच्याच निर्मल भावाचा र...