प्रेम कसे करावे

 लहानपणीच निस्वार्थ प्रेमाचे कौतुक आणि महत्व पटले होते. प्रेम आणि आपुलकी शिवाय जगण्याला काही फारसा अर्थ नसतो हे सुद्धा जाणवल्याचे आठवते. मी मात्र पुर्वी पासून एककल्ली, निरागस, आणि अंतर्मुख. 

अशा भाबड्या मनाला कोणी समजवावे कि सुखदुःख वगैरे सारे मनाचे खेळ असतात? प्रेमात सुद्धा मनस्ताप, गैरसमज इत्यादी असू शकतात याची कल्पना तेव्हा नव्हती. 

पुढे, अनेक लक्षात रहाणारे आणि विसरलेले अनुभव झाल्यावर, कुणाला कुणावर कळकळून प्रेम करण्याचे प्रोत्साहन देण्यात सुद्धा काही अर्थ नाही, असेही वाटून गेले.

आज, प्रेमाच्या विविध इष्टमुर्ति आठवताना खूप कृतज्ञतापूर्वक डोळे ओलावतात आणि सहज वाटून जाते कि आपल्या बाळांना सुद्धा हे असे प्रेम करायला शिकवले पाहिजे. होय, त्यांची प्रत्येक अपेक्षा आणि आशा वास्तवात काही आपल्या इष्टाचा प्रतिसाद मिळवणार नाही. पण आपण केलेल्या चुका त्यांना टाळता आल्या, तर मोठ्या आनंदाने जगतील आपली बाळे, एवढी आशा जपली आहे.

खरे प्रेम माणसाने माणसावर करावे कि नाही? कारण बहुतेकदा, ते प्रेम वाया जाते असेच आढळून येते. त्यात कितीही निस्वार्थ भाव असला तरी शेवटी स्वतःच्याच निर्मल भावाचा राग येतो. कारण शेवटी हाती येतात निव्वळ अविश्वास आणि चोराच्या उलट बोंबा.

म्हणून, हे साहजिकच सुचते कि प्रेम त्यांवर करावे जे काहीशा प्रमाणात का असेना, त्या प्रेमाची परतफेड नसली, तरी त्या प्रेमाच्या मोबदल्यात काहीसे अविस्मरणीय क्षण तरी देउन जातात. 

आणि अशा प्रेमाचे थोर मानकरी मला तरी लायब्ररी, झाडांची नर्सरी, आणि घरातील प्राण्यांच्या, सुझी आणि विनीच्या सहवासातच सापडले.

Suzi-Khandekar
Suzi Nikhil Khandekar 

चार पोरे-बाळे आलीच कधी, बोलायला, भेटायला, तर त्यांना न जुमानताच हाकलून लावण्या इतका मी निष्ठूर नाही. पण त्याच बरोबर हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे कि ही पोरे आपली नाहीत आणि त्यांच्या व त्यांच्या आईवडिलांच्या संमती शिवाय त्यांच्यावर प्रेम वगैरे करण्याचा कोणालाही ह्क्क नाही.

हे अगदी प्रामाणिक आणि व्यवहार्य मत आहे माझे. तरी, आपण मुळातच प्रेमळ मनाचे असतो, आणि त्यामुळेच माझ्यावर किंवा माझ्या प्रिय व्यक्तिवर भरभरून प्रेम    करणाऱ्यास नम्र नमस्कार! 

🙏

Comments

Popular posts from this blog

53 वर्षीय जिवाची तार

The Ladies and Me