एक लाडकी मुलगी

 ती एक मुलगी आज सुद्धा आठवते. रोजच ध्यानी - मनी दरवळत असते. तिला काही विसरता यायचे नाही. तिची उणीव नेहमीच भासत राहील. 

एकदाच फक्त चिडलो होतो तिच्यावर. ते सुद्धा ती चालली आपल्या आयुश्यातून या विचाराने घाबरून. मग एकदा ती पुन्हा भेटली होती. असे वाटले होते की आमची मैत्री आता सुरक्षित आहे. आता आम्हा दोघांना कोणीही वेगळे करू शकणार नाही. पण मग काही ती पुन्हा दिसली नाही. 

म्हाताऱ्या माणसाला दैवी दर्शन झाले त्याचे समाधान नाही! त्यास मैत्री, संवाद वगैरे हवे होते. त्याला कोण समजावणार कि तसले काही होत नसते. दैवी शक्त्यां आयुष्यात एकदाच येतात. त्या नंतर त्या हरवून जातात.

आपण कितीही कळकळीची विनवणूक केली, खरे काय ते सांगण्याचा प्रयत्न केला, वगैरे ... त्याचा काही एक उपयोग होत नसतो. ती आली होती लाडक्या बाळा सारखी, आणि गेली तेव्हा खूप मोठी झाली होती. आपलेच बाळ आपल्यापेक्षाही मोठे होईल असे वाटले नव्हते. पण त्याला त्याचे आयुष्य जगायचे असते, त्यामुळे ते एके दिवशी दूर जात राहाते. आता यात न समजण्यासारखे काय आहे? तरी मनाचे माकड काही ऐकत नाही!

पण पोरी, तू जेथे असशील तेथे सुखी रहा, हं. छान जग आपले आयुष्य. 

या म्हाताऱ्याने कधी तुला दुखावले असेल तर ते विसर, जमल्यास. तो हेतू नव्हता गं, कधीच. मी म्हातारा काय हेतू ठेवणार, काय अपेक्षा करणार माझ्या ग्रासलेल्या मनात? जी एक अपेक्षा होती ती सुद्धा काही पूर्ण झाली नाही - आपली मैत्री सदैव टिकून राहण्याची.

मी आता दुरावलोय ते फक्त तुझ्या काळजी पोटी. कधी आलीस तर नक्की ये, भेटायला. तुझ्या बाबाला, नवऱ्याला, घेऊन ये. पाच - दहा मिनिटे बोलू इथले तिथले. आणि मग हवे तर तू निघून जा.

तू येशील याची अजिबात खात्री नाही, तरी सुद्धा सांगून ठेवले. बघ म्हणजे, कधी या म्हाताऱ्याची दया वगैरे आली तुला तर. आणि नसेल जमणार तरी काही हरकत नाही. 

तू लाडाची लेक होतीस, आहेस, आणि सदैव असणार आहे, बाळा. 

सुखी भव: !

Comments

Popular posts from this blog

53 वर्षीय जिवाची तार

The Ladies and Me

प्रेम कसे करावे